मुख्यमंत्री दिसले प्रभू श्रीरामचंद्राच्या रुपात

सामना ऑनलाईन । हैदराबाद

तेलंगणामध्ये आज तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) तर्फे एक मोठी सभा आयोजित केली आहे. या रॅलीच्या ठिकाणी टीआरएस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे प्रभू श्रीराम चंद्राच्या रुपातील पोस्टर लावले आहेत. त्यांचे हे पोस्टर सध्या तेलंगणात चर्चेचा विषय ठरले आहेत.

टीआरएसने आज रंगा रेड्डी जिल्ह्याती प्रगती निवेदना सभा आयोजित केली आहे. या सभेच्या ठिकाणी चंद्रशेखर राव यांचा श्रीराम चंद्राच्या रुपातील उभा फोटो लावण्यात आला आहे. या त्यांच्या फोटोवरून अनेकांनी टीआरएसवर टीका केली आहे.