मुंबई गोवा महामार्गचे खड्डे टाळण्यासाठी एक्सप्रेसने प्रवास, बावनकुळे कोकण रेल्वेतही पाच तास लटकले

जागोजागी पडलेले भंयकर आणि जीवघेणे खड्डे यामुळे धोकादायक झालेला मुंबई गोवा महामार्गवरील प्रवास टाळण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे कोकणकन्या एक्सप्रेसने रत्नागिरीकडे निघाले, पण ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या बिघाडामुळे बावनकुळे पाच तास कोकण रेल्वेतच लटकले. मुंबई-गोवा महामार्गाची प्रचंड दुर्दशा झाली आहे. गेल्या दहा वर्षापासून कोकणवासीयांचा या भयंकर खड्डेमय रस्त्यातून प्रवास सुरू आहेत, त्यात अपघातामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. परंतु राज्यकर्ते कोकणवासीयांच्या या समस्येबाबत प्रचंड उदासीन आहेत.

मुंबई- गोवा महामार्गवरील खड्डयांमुळे कोकणातील मंत्री आणि बडे नेते कोकणात जाण्यासाठी विमानाने किंवा रेल्वेने प्रवास करतात. महामार्गाच्या दुरवस्थेबाबत कोकणी माणूस प्रचंड आक्रोश करत आहे, परंतु सतेच्या धुंदीत असलेल्या नेत्यांच्या कानापर्यत तो पोहोचत नाही. आता पाच तास रेल्वेत अडकून पडलेल्या नेत्यांना कोकणी माणसाचा त्रास समजेल आणि महामार्गाची बिकट अवस्था सुधारण्याची सुबुध्दी त्यांना येईल अशी प्रतिक्रिया सदानंद गावकर यांनी व्यक्त केली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी रस्तेमार्गाचा प्रवास टाळून कोकण रेल्वेने रत्नागिरी गाठण्याचे ठरवले होते, परंतु ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास मुंबईकडून गोव्याकडे जाणारी जनशताब्दी वीर रेल्वे स्थानकात थांबण्यात आली. त्यानंतर गोव्याहून मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्सप्रेसही वीर स्थानकातच थांबली. त्यानंतर पुढे कोकणकन्या एक्सप्रेसही तब्बल पाच तास वीर स्थानकात थांबवण्यात आली. त्यामुळे या ट्रेनमधून प्रवास करणारे बावनकुळे यांचा प्रवासही पाच तास खोळंबला.