अभी अपुन चाँद पे है! ‘चांद्रयान-2’चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश

1062

हिंदुस्थानच्या अवकाश मोहिमांमधील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या चांद्रयान 2 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश झाला आहे. पृथ्वीभोवतीची कक्षा विस्तारण्याची प्रक्रिया पार पडून चांद्रयान 2 चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करीत  होते. 20 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 ते 9.30 हा काळ इस्रोसाठी परीक्षेचा होता. ती कठीण परीक्षा पार करत चांद्रयान 2ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे.

चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती 65 हजार किमीपर्यंत असते. त्यामुळे चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यासाठी चांद्रयानाचा वेग कमी करावा लागतो. नाहीतर चांद्रयान चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली येऊन चंद्राला धडकू शकलं असतं. चांद्रयानाचा वेग कमी करण्यासाठी त्याची ऑनबोर्ड प्रोपल्शन सिस्टम काही काळासाठी सुरू केली होती. या काळात लहानशी चूकही महागात पडू शकली असती. पण, हे सगळे अवघड टप्पे पार करत चांद्रयानाने चंद्राच्या दिशेने अजून एक टप्पा पार केला आहे.

चांद्रयान-2’ ही चंद्रावर स्वारी करणारी हिंदुस्थानची मोहीम योग्य दिशेने चालली असून ठरल्याप्रमाणे हे यान चंद्राच्या दक्षिणेकडील बाजूला येत्या 7 सप्टेंबरला उतरणार आहे. या मोहिमेत इस्रो चंद्राच्या आतापर्यंत कधीही समोर न आलेल्या बाजूचे संशोधन करणार आहेचंद्राच्या पृष्ठभूमीवर उतरणारे हिंदुस्थानचे हे पहिलेच पाऊल असणार आहेया यानामध्ये ऑर्बिटरलॅण्डर आणि रोव्हर अशी तीन उपकरणे आहेतआपल्या बळावर चंद्रावर स्वारी करणारा हिंदुस्थान हा चौथा देश ठरला आहेयापूर्वी अमेरिकारशिया आणि चीनने चंद्रावर उतरण्याची कामगिरी केली आहेबुधवारीच हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार पहाटे तीन ते चार या वेळेत ‘ट्रान्स लुनर इन्सर्शन’ ही प्रक्रिया यानाने पार पाडली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या