60 वर्षांत 50 टक्के चांद्रमोहिमा अयशस्वी

604

हिंदुस्थानची चांद्रयान-2 मोहीम अयशस्वी झाल्याने अवघ्या देशाला खरूख लागली. पण अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 60 वर्षात जगभरात राबविलेल्या चांद्रमोहिमांपैकी 50 टक्के मोहिमा अयशस्वी ठरल्या आहेत.

1958 ते 2019 पर्यंत जगात 109 चांद्र मोहिमा झाल्या. यातील 61 यशस्वी झाल्या आहेत. जगातील पहिले चांद्रयान मिशन अमेरिकेने 17 ऑगस्ट 1958 ला केले. पण हे उड्डाण अयशस्वी झाले. पहिली यशस्वी चांद्रमोहीम 4 जानेवारी 1959 ला रशियाने पूर्ण केली. रशियाचे लुना-1 हे यान चंद्रावर लँड झाले. 1958 आणि 1959 मध्ये अमेरिका आणि रशियाने 14 मिशन राबविले. त्यातील तीनही रशियाचे मिशन यशस्वी झाले. अमेरिकेला 1964 मध्ये यश मिळाले. 1979 पर्यंत चांद्रयान मोहिमेत फक्त अमेरिका, रशियाचा दबदबा होता. त्यानंतर जपान, चीन, हिंदुस्थान, इस्त्राईलने या मोहिमांमध्ये पाऊल ठेवले.

जगभरातील मीडियाकडून कौतुकाचा वर्षाव

विक्रम लँडरचे चंद्रावर सॉफ्ट लँडींग करण्यास अपयश आले असले तरी न्यूयॉर्क टाईम्ससह जगभरातील प्रमुख मीडियाने इस्रोच्या शास्त्रज्ञांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. हिंदुस्थानने विकसित केलेले तंत्रज्ञान जागतिक स्तरावर अंतराळ क्षेत्रासाठी महत्त्वाकांक्षी आणि अधिक प्रबळ आहे. चांद्रयान-2 ही मोहिम केवळ अंशतः अपयशी झाली आहे. ऑरबीटर काम करीत आहे. इस्रोची कामगिरी कौतुकास्पद आहे, असे न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या