विदेशातही ‘इस्त्रो’चा डंका, मॉरिशसच्या पंतप्रधानांनी केले कौतुक

577

हिंदुस्थानच्या अंतरराळ योजनांपैकी एक असलेल्या ‘चांद्रयान-2’कडे (chandrayaan 2) संपूर्ण जगाचे लक्ष लागले असतानाच विक्रम या लँडरशी इस्रोचा चंद्रापासून अवघ्या 2.1 किलोमीटरवर असताना संपर्क तुटला. संपर्क तुटल्याने विक्रमचे यशस्वी लँडींग झाले का याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र देशासह विदेशातूनही इस्त्रोच्या या प्रयत्नाचे तोंडभरून कौतुक करण्यात येत आहे.

‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ (Pravind Jugnauth) यांनीही ‘इस्त्रो’च्या (ISRO) प्रयत्नांचे कौतुक केले आहे. हिंदुस्थानचे सरकार आणि इस्त्रोने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडर (Vikram lander) आणि प्रग्यान रोव्हर (Pragyaan rover) उतरवण्याचा प्रयत्न केला याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, असे प्रविंद जगन्नाथ म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, इस्त्रोने चांगला प्रयत्न केला मात्र यावेळेस ते यशस्वी झाले नाहीत. परंतु संपूर्ण जगाला हिंदुस्थानच्या अंतराळ संस्थेची ताकद आणि तंत्रज्ञानाची जाणीव झाली. तसेच भविष्यामध्ये मारिशस आणि इस्त्रोमध्ये समन्वय साधत अंतराळ संशोधनात एकत्र काम करण्याची इच्छाही जगन्नात यांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या