Chandrayaan-2 नासाच्या कॅमेऱ्यात ‘विक्रम’ लँडिंग साईटचे फोटो कैद, खूशखबर मिळणार?

1789

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कलंडलेल्या अवस्थेमध्ये असणाऱ्या ‘विक्रम लँडर’ आणि ‘प्रग्यान रोव्हर’शी संपर्क साधण्यासाठी अखेरचे दोन ते तीन दिवस बाकी आहेत. तीन दिवसानंतर विक्रम लँडिंग साईट पूर्णपणे अंधारामध्ये जाणार आहे. याच दरम्यान मंगळवारी नासाचे ‘लूनर रिकॉनिस्सेंस ऑर्बिटर’ (LRO) विक्रम लॅडिंग साईटवरून गेले. नासा विक्रम लँडिंग साईटचे फोटो काढले आहेत.

चंद्राला गेल्या 10 वर्षापासून प्रदक्षिणा घालणारे नासाचे लूनर रिकॉनिस्सेंस ऑर्बिटर (LRO) विक्रम लँडिंग साईटवरून गेले. यासंदर्भात नासाच्या ग्रह विज्ञान विभागाचे एक अधिकारी जोशुआ ए हैंडाल यांनी एक ई-मेल प्रसिद्ध केला आहे. यात त्यांनी म्हटले की, ‘लूनर रिकॉनिस्सेंस ऑर्बिटरच्या कॅमेराने (LRO) विक्रम लँडिंग साईटच्या भागातील फोटो कॅमेऱ्यामध्ये कैद केले, परंतु विक्रमचे नक्की ठिकाणाचा पत्ता लागलेला नाही. कदाचित विक्रम लँडर लूनर रिकॉनिस्सेंस ऑर्बिटर कॅमेराच्या (LRO) कक्षेपासून बाहेर असण्याची शक्यता आहे.’

‘एव्हिएशन विक’च्या मते, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या ठिकाणी विक्रम लँडरचा संपर्क तुटला होता, तिथे आता अंधार पडण्यास सुरुवात झाली असून कॅमेरा योग्य फोटो घेऊ शकत नाही. दरम्यान, आता लूनर रिकॉनिस्सेंस ऑर्बिटरची (LRO) टीम 17 सप्टेंबरला घेतलेल्या फोटोंची तुलना याआधी घेतलेल्या फोटोंसोबत करार आहे. यातून हे स्पष्ट होईल की विक्रम लँडर नक्कीच त्याच भागात आहे अथवा नाही. या फोटोंत विश्लेषण आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर ते सार्वजनिक करण्यात येतील.

इस्त्रोचे ट्वीट आणि …
इस्त्रोने (ISRO) मंगळवारी सायंकाळी 6.44 वाजता एक ट्वीट केले होते. ‘आमच्यासोबत ठामपणे उभे राहिल्याबद्दल धन्यवाद. जगभरातील हिंदुस्थानी लोकांचे आशा, आकांशा आणि स्वप्नांपासून प्रेरणा घेऊन आम्ही पुढे वाटचाल करत राहू’, असे ट्वीट इस्त्रोने केले. विक्रमशी संपर्क साधण्याच्या आशांबाबत हे ट्वीट असावे अशी शंका अनेकांनी व्यक्त केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या