चानू, जेरेमीवर हिंदुस्थानची मदार

आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपला आजपासून सुरुवात होणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत हिंदुस्थानची मदार मीराबाई चानू व जेरेमी लालरिनुंगा या खेळाडूंवर असणार आहे. हिंदुस्थानचे खेळाडू 2020 सालामध्ये राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यानंतर कोरोनामुळे या खेळाडूंना स्पर्धांपासून दूरच राहावे लागले. आता मीराबाई चानू 49 किलो वजनी गटात हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणार आहे. 2019 सालामध्ये तिचे कास्यपदक थोडक्यात हुकले होते. जेरेमी लालरिनुंगा याने 2018मध्ये युथ ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. पुरुष गटात त्याच्याकडून पदक पटकावण्याची आशा असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या