श्रीदत्तात्रेयक्षेत्र – ‘चौल’

1629
श्रीदत्तात्रेयक्षेत्र – ‘चौल’

पूर्वीचे इतिहासप्रसिद्ध चंपावतीनगर हेच आजचे चेऊल अथवा ‘चौलनगर’ होय. कुलाबा जिल्हय़ातील अलिबाग, थळ, साखर, अक्षी इत्यादी आठ आगारांपासून मिळून बनलेल्या आगरसमूहाला अष्टागर हे नाव पडले असून चौल हे या अष्टागाराचे पूर्वीचे राजधानीचे ठिकाण होते.चौलपासून साधारणतः एक मैल अंतरावर असलेल्या टेकडीवर हे चौलचे दत्तस्थान आहे. ही टेकडी दत्ताची टेकडी या नावाने ओळखली जाते. टेकडीच्या पायथ्याशी ‘भोपाळे तळे’ या नावाने एक तळे आहे.

या तळय़ाजवळून पुढे दत्त मंदिराकडे जाण्यासाठी पायऱया लागतात. एका वेळी दोन माणसे एकत्र जाऊ शकतील एवढय़ा त्या रुंद आहेत. एकूण पायऱयांची संख्या ५३० आहे. ३५ दत्तभक्तांनी नवस फेडण्याकरिता या सर्व पायऱया बांधविल्या आहेत. पायऱयांचे वळण थोडे वाकडे तिकडे असून सर्व पायऱया चढून जाण्यास अर्धा तास लागतो.

आपली प्रतिक्रिया द्या