हिंदू दहशतवादाच्या वक्तव्यावरून वातावरण तापले, कमल हासनवर चप्पलफेक

फाईल फोटो

सामना ऑनलाईन । चेन्नई

तामिळनाडूच्या मुदाराईमध्ये बुधवारी एका प्रचारसभेदरम्यान दाक्षिणात्य सुपरस्टार आणि मक्कल निधी मैय्यम पक्षाचे प्रमुख कमल हासन यांच्यावर एकाने चप्पल फेकली. परंतु नेम हुकल्याने ती त्यांना लागली नाही. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.

कमल हासनला म्हातारचळ लागलाय, अभिनेत्रीची सडकून टीका
गोडसे पहिला ‘हिंदू दहशतवादी’ बोलणाऱ्या कमल हासनची जीभ छाटली पाहिजे!

सोमवारी 12 मे रोजी चेन्नईतील अरावाकुरुची विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना नथुराम गोडसे हा स्वतंत्र हिंदुस्थानातील पहिला हिंदू दहशतवादी होता असे विधान हासन यांनी केले होते. यानंतर त्यांचा विरोध वाढत गेला होता. याच प्रकरणातून त्यांच्यावर ही चप्पलफेक करण्यात आली असावी असा संशय पोलिसांना आहे.

कमल हासनच्या समर्थनार्थ ओवैसी आले धावून

अंतरिम जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव
दरम्यान, गोडसे यांच्याबाबत दिलेल्या वक्तव्यावरून कमल हासन अडचणीत आले आहेत. त्यांच्याविरोधात अरावाकुरुची येथे एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यानंतर बुधवारी त्यांनी अंतरिम जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याआधी उच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधात केस दाखल न करण्याच्या मागणीची याचिका फेटाळली होती.