‘प्रबोधन’ची ‘धमाल मस्ती’, राजू तुलालवार यांच्याशी आज गप्पा

प्रबोधन कुर्ला शाळा आणि पल्लवी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘धमाल मस्ती’ या ऑनलाइन शिबिराला जबरदस्त प्रतिसाद मिळत असून आज सकाळी 11 वाजता बाल रंगभूमीवरील ज्येष्ठ दिग्दर्शक राजू तुलालवार जगभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी गप्पा मारणार आहेत.

14 तारखेला रेश्मा गुप्ते यांच्या हस्तकला विषयक मार्गदर्शनाने या शिबिराला सुरुवात झाली. शनिवारी ज्येष्ठ कवी डॉ. महेश केळुसकर यांनी युटय़ूब, फेसबुक आणि झूम या तिन्ही सोशल प्लॅटफॉर्मवरून एकाच वेळी हजारो जणांशी संवाद साधला. आज राजू तुलालवार गप्पा मारणार आहेत, अशी माहिती संस्था अध्यक्ष भाऊ कोरगावकर यांनी दिली. हे शिबीर निःशुल्क असून https://forms.gle/1pYw94re76yc68hz7 या लिंकवर मात्र रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. या ‘धमाल मस्ती’त ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे, ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे हेसुद्धा सहभागी होणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या