शिवराज्याभिषेक दिन ठिकठिकाणी उत्साहात साजरा

622

युगपुरुष आणि सर्वांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांचा 347 वा शिवराज्याभिषेक दिन आज कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी, सोशल मिडियाचा वापर करून लाईव्ह प्रक्षेपणातुन कोल्हापूरकरांनी शिवरायांना मानवंदना दिली.

सध्याच्या कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी नियमांचे पालन करत , “छत्रपती शिवाजी महाराज मनामनात, शिवराज्याभिषेक सोहळा घराघरात” ही संकल्पना राबवुन साधेपणाने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. अनेक शिवप्रेमींनी आपापल्या घरीच भगवा ध्वज फडकवुन, शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन व अभिषेक करून शिवराज्याभिषेक दिन साजरा केला.

दरम्यान ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शिव-शाहु मर्दानी आखाड्याच्यावतीने अमोल बुचडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आकर्षेक फुलांची सजावट करुन, संपुर्ण सोहळ्याचे सोशल मिडियाद्वारे लाइव्ह प्रक्षेपण केले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, महापौर निलोफर आजरेकर, खासदार संजय मंडलीक, आमदार चंद्रकांत जाधव, मराठा महासंघाचे वसंत मुळीक, बबन रानगे, कादर मलबारी यांच्यासह शहर आणि जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांच्या वतीने शिवरायांना अभिवादन करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या