संतापजनक! अल्पवयीन बहिणींवर 11 नराधमांचा सामूहिक बलात्कार, आरोपींमध्ये दोघे अल्पवयीन

GANGRAPE IN BIHAR

छत्तीसगडमध्ये संतापजनक घटना समोर आली असून बलौदाबाजार-भाटापारा जिल्ह्यात दोन अल्पवयीन बहिणींवर 11 नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 11 जणांना अटक केली असून आरोपींमध्ये 2 अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. अजय वर्मा (25), सोहन ध्रुव (19), राजेंद्र डहरिया (23), शिवम वर्मा (18), पीयूष वर्मा (19), राकेश डहरिया (23), जगन्नाथ यादव (24), राकी घृतलहरे (19) आणि गोपी साहू (19) अशी अटक केलेल्यांची नावे असून दोघा अल्पवयीन मुलांची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 जुलै रोजी महिला हेल्पलाईन नंबर 181 वर एका अल्पवयीन मुलीने फोन केला. दोन महिन्यांपूर्वी तिच्यावर आणि तिच्या बहिणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार नोंदवली. दोन्ही बहिणींचे वय 14 आणि 16 असे आहे.

पीडित मुलींनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या वडिलांची भेट घेत घटनेची माहिती मिळवली. 31 मे रोजी पीडित बहिणी दोन मित्रांसोबत बाहेर गेल्या असता आरोपींनी त्यांना घेरले आणि पुरुष मित्रांना मारहाण करून हाकलून दिले. यानंतर आळीपाळीने बलात्कार केला, असा आरोप पीडित बहिणींनी केला.

या दरम्यान आरोपींनी याचा व्हिडीओ चित्रित करत तो व्हायरल करण्याची धमकी देऊन गप्प राहण्यास सांगितले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी सातत्याने संपर्क साधून धमक्या देत असल्याने अखेर त्यांनी महिला हेल्पलाईन नंबरवरून आपबिती कथन केली. यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या