छत्तीसगडमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

37
प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी । नागपूर

भामरागड तालुक्यात महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सिमेवरील करेवाडा जंगल परिसरात शनिवारी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त केले आहे.

भामरागड त्रिवेणी संगमापासून ६ किमी अंतरावर छत्तीसगड सिमेलगत पोलीस पथक नक्षलविरोधी शोधमोहिम राबवित असताना नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पळून गेले. यावेळी शोधमोहिम राबविण्यात आली असता घटनास्थळावर नक्षली गणवेश, पत्रके, पुस्तके तसेच अन्य साहित्य आढळून आले. साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. परिसरात शोधमोहिम तीव्र करण्यात आली आहे

आपली प्रतिक्रिया द्या