मालेगावात ‘परदानशीन’ची विशेष तपासणी होणार

22

 

सामना ऑनलाईन, नाशिक

मालेगाव महापालिकेतील बोगस मतदान टाळण्यासाठी मतदान केंद्रांवर ‘परदानशीन’ अर्थात बुरखाधारी महिलांची विशेष तपासणी करण्यात येणार आहे. या अंमलबजावणीबाबत मालेगावच्या मुस्लिमांमध्ये उलटसुलट चर्चा होत आहे.

मालेगाव महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी २४ मे रोजी मतदान होत आहे. बोगस मतदान टाळता यावे यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जात आहे. मागील निवडणुकांमध्ये ‘परदानशीन’ अर्थात बुरखाधारी महिलांच्या नावाखाली पुरुषांनीच बुरखे परिधान करून बोगस मतदान केल्याचा संशय होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तशा गुप्त तक्रारीही करण्यात आल्या होत्या. मुस्लिमबहुल पूर्व भागात सुमारे साडेतीनशे मतदान केंद्रे आहेत. बुरखा वर करून मुस्लिम महिलांचा चेहरा पाहण्यास मुस्लिमांचा तीव्र विरोध आहे. अशा परिस्थितीत बुरखा घातलेला पुरुष आहे की महिला, याची खात्री करण्यासाठी मतदान केंद्राजवळ विशेष खोलीची व्यवस्था करण्यात आली आहे. बुरखाधारी महिलेला या खोलीत नेऊन महिला पोलीस व महिला होमगार्ड तिच्या तोंडावरील बुरखा वर करून ही महिलाच असल्याची व तिच्याजवळ तिचेच ओळखपत्र असल्याची खात्री करेल. या अंमलजावणीमुळे काही धर्मांध मुस्लिमांचे पित्त खवळले असून, ते या कारवाईला ऐनवेळी विरोध करण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या