बीड जिल्ह्यातील चेक पोस्टवरील पोलिसांना मास्क आणि सॅनिटायझरची गरज

3509

बीडमध्ये दिवसरात्र जिल्ह्याच्या सीमारेषेवर तैनात असलेल्या पोलिसांना कोरोनापासून बचावासाठी मास्क आणि सॅनिटायझर देण्याची गरज व्यक्त होत आहे. जिल्हा सील करण्यात आला असून जिल्ह्याच्या सीमारेषेवर चेक पोस्टवर चोवीस तास पोलीस तैनात आहेत. मात्र, या पोलिसांना मास्क किंवा सॅनिटाईझर देण्यात आलेले नाही. त्यामुळे चेहऱ्यावर रुमाल गुंडाळून ते चेकपोस्टवर काम करत आहेत.

जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या असल्या तरी जिल्ह्यात परतणाऱ्या नागरिकांची संख्या लाखांवर आहे. या नागरिकांच्या संपर्कात पोलीस येत आहेत. त्यामुळे त्यांनाही संक्रमणाचा धोका आहे. जिल्ह्याला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी तब्बल 20 चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. या 20 चेकपोस्टवर दिवसरात्र पोलीस तैनात आहेत. पण पोलिसांना कोरोनापासून बचावासाठी आवश्यक असलेल मास्क आणि सॅनिटायझरही देण्यात आलेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या