‘चेल्सी’चा लिजंड खेळाडू Jimmy Floyd Hasselbaink ची मुंबईला भेट, धारावीतील चिमुरड्यांसोबत रंगला ‘सामना’

चेल्सी फुटबॉल क्लब फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी दिग्गज खेळाडू Jimmy Floyd Hasselbaink हा गेल्या आठवड्यामध्ये मुंबईच्या दौऱ्यावर आला होता. मुंबईतील धारावी येथील झोपडपट्टीतील मुलांसोबत त्याने काही काळ घालवला. यावेळी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यादरम्यान त्याने अभिनेता अर्जुन कपूर याचीही भेट घेतली. अर्जुन कपूर हा चेल्सी फुटबॉल क्लबचा मोठा फॅन आहे.

चेल्सी फुटबॉल क्लब फाउंडेशनच्या सदस्यांसह Jimmy Floyd Hasselbaink हा धारावीत पोहोचला. एकविरा मित्र मंडळ कम्युनिटी सेंटर येथे त्याने लहान मुलांसोबत काही काळ घालवला. तसेच तरुणांशीही संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या दरम्यान त्याने आपले अनुभवही त्यांच्यासोबत शेअर केले. यासह काही खेळांमध्येही त्याने सहभाग घेत धमाल उडवून दिली.