लस घेतलेल्या ग्राहकाला सलूनमध्ये 50 टक्के सवलत

देशात कोरोनाची दुसरी लाट मंदावली आहे. पण तिसऱ्या लाटेचा इशारा मात्र वैद्यकीय तज्ञ सतत देत आहेत. त्यामुळेच कोरोना लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध थरातून प्रयत्न केले जात आहेत. तामीळनाडूतील मदुराईतील एका सलून चालकाने लसीकरण केलेल्या ग्राहकाला केश करताना 50 टक्के दर सवलत देण्याची घोषणा केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी आपल्याला लसीचे डोस घ्यायलाच हवेत, असे सांगून सलून मालक कार्तिकेयन याने अशा ग्राहकांना कमी दरात सेवा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या