बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने केला आईचा खून?

15

सामना ऑनलाईन । चेन्नई

बलात्काराच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर असलेल्या मुलाने आईची हत्या केल्याची घटना चेन्नई येथे उघडकीस आली आहे. सदर मुलगा आईच्या हत्येपासून बेपत्ता असून त्यानेच आईचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या पोलीस त्या मुलाचा शोध घेत आहेत.

सरला (४५) असे त्या महिलेचे नाव असून बेदम मारहाण झाल्याने तिचा मृत्यू झाला आहे. शेजाऱ्यांनी पोलिसांना सरला यांच्या मृत्यूबाबत सांगितले. पोलीस सरला यांच्या घरी पोहचले तेव्हा त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या व त्यांच्या अंगावरील व घरातील दागिनेही चोरीला गेलेले आढळले. त्यामुळे सुरुवातीला एखाद्या चोराने ही हत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. मात्र या महिलेचा मुलगा दशवंत (२३) हत्येच्या दिवसापासून गायब असल्याने पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला आहे.

दशवंतने काही महिन्यांपूर्वी सात वर्षांच्या मुलीचे लैगिंक शोषण करून तिची निर्घृणपणे हत्या केली होती. याप्रकरणी त्याला अटकही करण्यात आली होती. मात्र फेब्रुवारी महिन्यात त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या