ग्लोबल बुद्धिबळ लीगच्या प्रचारासाठी मुंबईत बुद्धिबळ फ्लॅश मॉब

यावर्षी प्रथमच आयोजित करण्यात येणाऱ्या ग्लोबल बुद्धिबळ लीगच्या प्रचारासाठी शुक्रवारी मुंबईतील प्रतिष्ठेच्या वांद्रे किल्ल्यावर बुद्धिबळ फ्लॅश मॉब करण्यात आला. मॉबच्या निमित्ताने एकत्र आलेल्या बुद्धिबळ प्रेमींसाठी आगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल लीग 21 जून ते 2 जुलै दरम्यान दुबई चेस अ‍ॅण्ड कल्चर क्लबमध्ये होणार आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील वांद्रे परिसरात असलेला वांद्रे किल्ला एक प्रमुख ऐतिहासिक स्थळ मानले जाते. कॅस्टेला डी अॅग्युआडा म्हणूनही त्याची ओळख आहे. या किल्ल्यावरून वरळी सी-लींकचे निरीक्षण करता येते. याच ऐतिहासिक ठिकाणी फ्लॅश मॉबचे आयोजन करण्यात आलेल्या सर्वजण चकित झाले. यावेळी असंख्य बुद्धिबळ चाहत्यांसह चेसबेस इंडियाचे सह संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सागर शहा उपस्थित होते.

या मॉबमधील स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला लोकेश नाटू म्हणाला, या निमित्ताने मुंबईच्या वांद्रे किल्ला बुद्धिबळाने भारलेला दिसून आला. या मॉबच्या सादरीकरणात कमालीची उर्जा आणि वेग होता. या मॉबने ग्लोबल बुद्धिबळ लीगविषयीची उत्कंठा शिगेला पोचली. मी या लीगची आतुरतेने वाट पहात आहे.

या बुद्धिबळ मॉबमध्ये चाहत्यांना करण्यासाठी अनेक गोष्टी होत्या. यामध्ये ग्लोबल लीग प्रमाणे संयुक्त संघ शैलीतील ब्लिटझ बुद्धिबळ स्पर्धेचा समावेश होता. यानंतर उपस्थितांसाठी पॉप क्वीझचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर मॉबमधील आयोजित स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

या उपक्रमाविषयी माहिती देताना ग्लोबल चेस लीग मंडळाचे अध्यक्ष जगदीश मित्रा म्हणाले, ग्लोबल चेस लीग ही बुद्धिबळ खेळातील एक आगळी स्पर्धा असले. ज्यामुळे बुद्धिबळल जगाच्या कानाकोपऱ्यात पोचेल. मुंबईतील लोकांचा सहरभाग आणि उत्साह पाहून आम्हाला आनंद होत आहे. आजचा कार्यक्रम ही या मोठ्या लीगच्या सुरुवातीची नुसती झलक आहे. भविष्यात या बुद्धिबळ लीगला जगभरातील घराघरांत पोचविण्याचा आमचा प्रयत्न असेल.