‘चेतना’त ‘सगुण्या’ची क्रेझ

43

वांद्रे पूर्व येथील चेतना कॉलेजमध्ये सेल्फ फायनान्स कोर्स अंतर्गत ‘सगुण्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वेगवेगळ्या कोर्सचे शिक्षण घेत असताना भावी आयुष्यात उत्तम करीअर बनवण्यासाठी या सोहळ्याच्या निमित्ताने विविध क्षेत्रांतील तज्ञ आणि यशस्वी दिग्गजांचे मार्गदर्शन मिळणार आहे. यंदाच्या अकराव्या ‘सगुण्या’ महोत्सवात आर्मीपासून नेव्ही, एमपीएससी, यूपीएससी, सीए, फॅशन डिझायनिंग, स्टडी इन ऍब्रॉड, स्पोर्टस् अशा विषयांवर तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या फेस्टिव्हलच्या निमित्ताने एमपीएससी, यूपीएससी, आर्मी, नेव्ही, कोस्ट गार्ड, एव्हिएशन, एमबीए, वेब डिझायनिंग, मेडिकल इन्स्टिटय़ूट, हॉटेल मॅनेजमेंट, शेअर मार्केट अशा विविध क्षेत्रांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या