Iran Israel USA War मुळे औषधी व्यवसायही आजारी पडणार? छत्रपती संभाजीनगर औद्योगिक वसाहतीचे दररोज ५०० कोटींचे नुकसान!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Chhatrapati Sambhajinagar Industry Faces 500 Cr Daily Loss Amid Iran War Saamana

अमेरिका, इस्रायलने इराणवर लादलेल्या मुद्धाचे हादरे जगभर बसत आहेत. कच्चे तेल, गॅसचा पुरवठा बंद शाल्याने औद्योगिक वसाहतींचा खास गुदमरला आहे. एकट्या छत्रपती संभाजीनगरमधील दोन ते अडीच हजार कारखाने गैस नसल्यामुळे कोणत्याही क्षणी बंद होणार आहेत. यापैकी अनेक कारखान्यांनी अगोदरच उत्पादन घटवले आहे. गॅस, कच्च्या तेलाचा पुरवठा बंद झाल्याने औद्योगिक वसाहतीचे दररोज किमान ५०० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा थांबवण्यात आल्याने हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंटही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे औषध निर्मिती कंपन्यांना देखील गॅसची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर असते. त्यांनाही गॅस उपलब्ध न झाल्यास मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमधील बुद्धाचा बेट परिणाम छत्रपती संभाजीनगर औद्योगिक वसाहतीवर झाला आहे. आखाती देशातून होणारा कच्च्या तेलाचा तसेच गॅसचा पुरवठा थांबल्यामुळे भारतात दाणादाण उडाली आहे. केंद्र सरकारने गॅसचा समावेश जीवनावश्यक वस्तूमध्ये करून साठेबाजीला आळा घालण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर घरगुती गॅसचा पुरवता सुरळीत ठेवून औद्योगिक बसाहतींना लागणारे सुमो सिलिंडर, व्यावसामिक सिलिंडरचा पुरवठा थांबवण्याचे आदेश देण्यात आले. घरगुती गॅससाठी आता तीन आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

छत्रपती संभाजीनगरातील शेंद्रा, वाळूज, रेल्वेस्टेशन, चिकलठाणा, चितेगाष या औद्योगिक वसाहतींना दररोज ३०० मेट्रिक टन व्यावसायिक गॅस लागतो. यात एलपीजी, प्रोपेन आदी गॅसचा समावेश आहे. काही कंपन्यांमध्ये कच्च्या तेलाचाही वापर होतो. पाच मार्चपासून व्यावसायिक गॅसचा पुरवठा तेल कंपन्यांनी थांबवला आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील छोटे कारखाने लगेच बंद झाले. ज्यांच्याकडे गॅस उपलब्ध होता त्यांनी पुढचे चार दिवस कसेबसे रेटले, मात्र सोमवारी अनेक कारखान्यांचे चक्र थांबले, छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतीत जवळपास साडेचार हजार कारखाने आहेत, त्यापैकी निम्मे कारखाने आज, उद्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यापैकी बऱ्याच कारखान्यांमध्ये कंत्राटी कामगार कामाला आहेत. कारखाने बंद झाल्यामुळे जवळपास १५ ते २० हजार कंत्राटी कामगारांवर बेकारीची कुल्हाड कोसळली आहे, त्याचबरोबर दैनंदिन उत्पादन बंद झाल्यामुळे वा घटल्यामुळे दररोज किमान ५०० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.

पावडर कोटिंगचे १०० उद्योग बंद

केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने प्रोपेन तसेच ब्यूटेन वायूचा वापर केवळ घरगुती एलपीजी उत्पादनासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे औद्योगिक क्षेत्राचा एलपीजी गॅसपुरवठा रोखण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगरातील उद्योगांवर गंभीर परिणाम होऊन उद्योग गॅसवर गेले आहेत. गॅस मिळत नसल्यने पावडर कोटिंग उद्योग मंगळवारपासून बंद करण्याची वेळ उद्योजकांवर आली. याचा उद्योग क्षेत्रावर मोठा परिणाम झाल्याची माहिती ‘मसिआ’चे अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी दिली. गॅस बंद असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘मसिआ’ची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत उद्योजकांनी आपल्या अडचणी मांडल्या.

हॉटेल व्यवसायावरही संक्रांत

छत्रपती संभाजीनगरात लहान मोठे, तीन तारांकित, पंचतारांकित, कावे, रेस्टॉरंट, नाश्ता सेंटर अशा स्वरूपात मोठा हॉटेल व्यवसाय चालतो, शहरात किमान पाचशे हटिल असून तेवढेच बाहेरील भागात आहेत. व्यावसायिक गॅसचा पुरवठा थांबल्यामुळे हॉटेलातील किचन बंद करण्याची वेळ हॉटेल व्यावसायिकांवर आली आहे. सध्या सुट्यांचा मोसम आहे. शहरात पर्यटकांची रेलचेल आहे. हॉटेलात खाद्यपदार्थच मिळणे बंद झाल्यास पर्यटकांचे हाल होणार आहेत.

औषधी व्यवसायावरही परिणाम

छत्रपती संभाजीनगरात फार्मा हबही आहे. येथील औषधी कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची औषधी तयार होते. गॅसचा पुरवठा बंद झाल्यामुळे औषधी कारखान्यांवरही उत्पादन थांबवण्याची वेळ आली आहे. औषधांचे उत्पादन घांबल्यास त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.