शिवरायांचा पुतळा कोसळला; काँग्रेसचं मुंबईत आंदोलन, अनेक कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा 35 फुट उंच पुतळा अनावरणाच्या फक्त 8 महिन्यांत कोसळल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्यातील भ्रष्ट मिंधे सरकारने महाराष्ट्राच्या अस्मिता आणि प्रतिष्ठेला ठेच पोहोचवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाच्या भावनांचा अपमान आहे. या मुद्द्यावरून काँग्रेसने मिंधे सरकारविरुद्ध मोठे आंदोलन आयोजित केले होते.

आज, म्हणजेच शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई आणि पालघरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याआधीच मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या जनतेकडून माफी मागण्याची अपील केली होती. पण मोदी यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, मुंबई काँग्रेस आणि यूथ काँग्रेसने मुंबई शहरात ‘मोदी माफी मागा’ असे पोस्टर लावले. काँग्रेसने मिंधे सरकारवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निर्माणामध्ये गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. काँग्रेसने म्हटले आहे की, राज्यातील भ्रष्ट सरकारची भूक इतकी वाढली आहे की त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही सोडले नाही. आपल्यावरची जबाबदारी झटकत नेव्हीवर हे खापर फोडत आहेत.

महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अवमान करणाऱ्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, नाना पटोले यांचा घणाघात

मुंबई काँग्रेसने पोस्टर लावल्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि मुंबई काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या घरात नजरकैदेत ठेवले होते. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी त्यांच्या घरामध्ये नजरकैदेमध्ये ठेवले होते. त्याचप्रमाणे, पोलिसांनी आमदार असलम शेख, अमीन पटेल, नसीम खान, आणि भाई जगताप यांनाही ताब्यात घेतले. अन्य काँग्रेस नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबईसह पालघरमध्येही काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वर्षा गायकवाड यांनी बीकेसीमध्ये आज निदर्शनांसाठी मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली होती, पण सरकारच्या दबावामुळे निदर्शनाची परवानगी देण्यात आलेली नाही. पुढे, वर्षा गायकवाड यांच्यावर मोदींच्या दौऱ्यादरम्यान कोणत्याही प्रकारचे निदर्शन न करण्याचा दबाव आणण्यात आला. बीकेसीमध्ये निदर्शनावेळी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले.

आपटे अचानक उपटले कसे? शिवपुतळा दुर्घटनेवरून संजय राऊत यांचा संतप्त सवाल, ठाणे कनेक्शनवर ठेवलं बोट

गेल्या डिसेंबर महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. पण यामध्ये झालेल्या दुर्लक्षामुळे आठ महिन्यांमध्येच हा पुतळा पडला.