छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख, सोनी वाहिनीने मागितली माफी

‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी सोनी टीव्हीने आज दिलगिरी व्यक्त केली. सोनी वाहिनीने झालेली चूक मान्य करत माफी मागितली.

‘कौन बनेगा करोडपती-11’ च्या एका भागात प्रश्नांचे पर्याय सांगताना अमिताभ बच्चन यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे शिवप्रेमी संतापले. अमिताभ यांनी माफी मागावी अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरायला लागली. हे प्रकरण अधिक चिघळण्याआधीच सोनी वाहिनीकडून माफीनामा जारी करण्यात आला. ‘केबीसीच्या भागात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनवधानाने एक चूक झाली ज्याबद्दल आम्हाला खेद वाटतो’ असे म्हणत सोनी वाहिनीने माफी मागितली.

आपली प्रतिक्रिया द्या