छत्तीसगड – चिमुरड्यासह महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, बलात्काराचा संशय

1741
प्रातिनिधिक फोटो

हैदराबाद येथील पशूवैद्य डॉक्टर प्रियंका रेड्डी गँगरेप आणि हत्या प्रकरण ताजे असतानाच आता छत्तीसगडमध्य़े देखील असाच प्रकार समोर आला आहे. छत्तीसगडमधील रायपूर येथे महिलेचा व लहान मुलाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. नाक्ती पोलीस स्थानकाचे कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

व्हायरल व्हिडीओतील व्यक्ती प्रियंका रेड्डी बलात्कार प्रकरणातील आरोपी आहे? वाचा सत्य

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रायपूर येथे नागरिकांना महिलेचा व मुलाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. जागरूक नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. ही महिला कोण? हत्येमागील कारण काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहेत. तसेच हत्येपूर्वी महिलेवर बलात्कार झाला अथवा नाही याचाही पोलीस तपास करत आहेत.

हैदराबाद प्रकरण ताजे…

हैदराबाद येथील प्रियंका रेड्डी या महिला डॉक्टरवर चार नराधमांनी बलात्कार केला आणि तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी तरुणीचा मृतदेह पेट्रोल-डीझेल टाकून जाळून टाकला. या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

‘त्या’ रात्री नक्की काय घडलं? प्रियंका रेड्डी बलात्कार व हत्या प्रकरणाचा संतापजनक अहवाल उघड

देशभरात निदर्शनं

प्रियंका रेड्डी गँगरेप व हत्याकांडामुळे हैदराबादसह संपूर्ण देशभरात संतापाची लाट उठली असून ठिकठिकाणी विरोध प्रदर्शन सुरू आहेत. आरोपींना तात्काळ फाशी देण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. सोमवारी राज्यसभा आणि लोकसभेत देखील हा मुद्दा गाजला.

ठेचून काढा, 31 डिसेंबरपूर्वी फाशी द्या! प्रियंका रेड्डी प्रकरणाचे राज्यसभेत पडसाद

आपली प्रतिक्रिया द्या