कॉन्स्टेबलला अश्लील कॉल केले आणि बंगल्यावर बोलावलं, महानिरीक्षकाचे महाउपदव्याप

44

सामना ऑनलाईन, रांची

छत्तीसगड मधील महानिरीक्षक पदावरील पोलीस अधिकारी पवन देव यांना सक्तीची निवृत्ती दिली जाण्याची दाट शक्यता आहे. एका महिला कॉन्स्टेबलला मध्यरात्री फोन करून तिच्याशी अश्लील भाषेत बोलणे, बंगल्यावर कोणी नसताना ये असे वारंवार मेसेज पाठवणे असे उपदव्याप त्यांनी केले आहेत. या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाने छत्तीसगड सरकारकडून अहवाल मागवला आहे. यापूर्वी देव हे महिलांच्या हक्क, सुरक्षेसाठी गठीत करण्यात आलेल्या विशाखा समितीच्या चौकशीत  दोषी आढळलेले आहेत.

ज्या विशाखा समितीने देव दोषी अससल्याचा अहवाल दिला होता, त्यामध्ये एक महिला सनदी अधिकारी आणि ३ महिला पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता. या समितीने एक वर्षापूर्वीच आपला अहवाल दिला आहे. मात्र त्यानंतरही देव यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. हा अहवाल सादरह केल्यानंतरही देव यांनी पिडीत महिला कॉन्स्टेबलला त्रास देणं थांबवलेलं नाहीये. आता त्यांनी तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव टाकायला सुरूवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडे याबाबतचा अहवाल गेल्यानंतर देव यांच्यावर कारवाई अटळ मानली जात आहे. अशा घटनांमध्ये या आधी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सक्तीच्या निवृत्तीवर पाठवण्यात आलेलं होतं. देव यांनाही तोच न्याय लागू केला जाईल असं सांगण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या