छत्तीसगडच्या दंतेवाडा नारायणपूर सीमेवर चकमक, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा

naxal-attack
फाईल फोटो

छत्तीसगडच्या दंतेवाडा नारायणपुर जिल्ह्याच्या बॉर्डरवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली आहे. या चकमकीत 30 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सातही जणांचे मृतदेह आणि मोठ्या संख्येने स्वयंचलित शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. चकमक अजून सुरुच असून दोन्ही बाजूने गोळीबार सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दंतेवाडाचे एसपी गौरव राय यांनी याची पुष्टी केली आहे. खात्मा करण्यात आलेल्य़ा नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते. या अभियानात सर्व जवान सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. नारायणपुर-दंतेवाडा सीमेवर माड परिसरात नक्षलवाद्यांची शोध मोहिम सुरु आहे. या घटनेचा तपास केला जात आहे.