छत्तीसगड येथे नक्षलवाद्यांशी चकमक; चार जणांचा खात्मा तर एक पोलीस शहीद

596

छत्तीसगड येथे सुरक्षा दलांची नक्षलवाद्यांशी चकमक झाल्याचं वृत्त आहे. या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले असून एक पोलीस कर्मचारी शहीद झाला आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, छत्तीसगडच्या राजनांदगाव इथे ही चकमक झाली. सुरक्षा दलांनी येथील मानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारधोनी गाव परिसरात शोधमोहीम राबवली होती. त्यावेळी ही चकमक झाली. या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले. तर एक पोलीस कर्माचारी शहीद झाला. घटनास्थळाहून सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर दारुगोळा जप्त केला आहे. यात एके-47 रायफल, एक एसएलआर बंदूक, 2 अन्य रायफल, काडतुसं आणि विस्फोटकं सापडली आहेत.

हा सर्व शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. परिसरात अजूनही शोधमोहीम जारी असून सध्या हा परिसर सील करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या