चर्चेशिवाय अर्थसंकल्पाला मंजुरी मिळणं हा लोकशाहीचा वाईट संदेश, पी. चिदंबरम यांची टीका

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थ मंत्री पी. चिदंबरम यांनी अर्थसंकल्पाला दिलेल्या मंजुरीवरून टीका केली आहे. कोणत्याही चर्चेशिवाय अर्थसंकल्पाला मंजुरी मिळणं हा लोकशाहीचा सगळ्यात वाईट संदेश असल्याचं चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

1 एप्रिल रोजी सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात सुमारे 45 लाख कोटी खर्चाच्या अर्थसंकल्पाला चर्चेशिवाय मंजुरी मिळाली आहे. त्यावरच चिदंबरम यांनी टीका केली आहे. एका ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी ही टीका केली आहे. ते म्हणाले की, संसदीय लोकशाहीचा हा सगळ्यात वाईट संदेश आहे की चर्चेशिवाय अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. आर्थिक वर्षं 2023-24मध्ये 45 लाख 3 हजार 97 कोटी रुपयांच्या या अर्थसंकल्पातून, लोकप्रतिनिधी लोकांच्या मतांशिवाय खर्च करण्यात आहेत, असं चिदंबरम यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.