स्मार्टफोनमुळे लहान मुलांमध्ये वाढल्या डोळे कोरडे होण्याच्या समस्या

सामना ऑनलाईन। सेऊल

स्मार्टफोन व कम्प्युटरच्या सततच्या वापरामुळे लहान मुलांमध्ये डोळे कोरडे होण्याच्या समस्या वाढल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. योग्य वेळीच यावर नियंत्रण न मिळवल्यास भविष्यात मुलांना डोळ्यांसंदर्भात गंभीर आजार उदभवू शकतात असा इशारा दक्षिण कोरियातील चुंग आंग यूनिर्व्हसिटी हॉस्पिटलमधील संशोधकांनी दिला आहे.

या यूनिव्हर्रसिटीतर्फ स्मार्टफोन व कम्प्युटरच्या वापराचा लहान मुलांच्या डोळ्यांवर होणारा परिणाम या विषयावर सर्वेक्षण करण्यात आले होते. यात मुलांमध्ये डोळ्यांच्या समस्य़ा वाढल्याचे स्पष्ट झाल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

दिवसेंदिवस लहान मुलांमध्ये व्हिडीओ डिस्प्ले टर्मिनल (व्हीडीटी) म्हणजेच स्मार्टफोन आणि कम्प्युटरचा वापर करण्याचे व्यसन वाढत आहे. याचा ताण थेट बुबुळांवर होत असल्याने मुलांमध्ये ऑक्यूलर सरफेस या आजाराची लक्षणे दिसत असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे. यात लहान मुलांच्या डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो. डोळ्यांमध्ये खाज येते. यावर ताबडतोब उपचार केल्यास हा आजार बरा होवू शकतो असा विश्नास तज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यास पुढे जाऊन डोळ्यांचा गंभीर आजार होण्याचा धोका असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे ग्रामीण विभागातील लहान मुलांच्या तुलनेत शहरातील मुलांमध्ये सर्वाधिक डोळे कोरडे होण्याची समस्य़ा असल्याचे या सर्वेक्षणात समोर आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या