प्रलंबित खटल्यांचा निपटारा प्राधान्याने करा: सरन्यायाधीश

12
सामना प्रतिनिधी । मुंबई
पाच वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीपासून तुरुंगात असलेल्या कैद्यांना दिलासा देणारी सूचना सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी केली आहे. सर्वोच्च आणि उच्च न्यायालात प्रलंबित असलेले सर्व खटले प्राधान्याने निकालात काढावेत, अशी सूचना त्यांनी केली आहे. त्यामुळे बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेले खटले निकाली निघणार आहेत.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खटल्यांचा निपटारा करण्यासाठी मिश्रा यांनी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अनेक वर्षांपासून केवळ आरोपी म्हणून तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या मनस्थितीची कल्पना आल्याने त्यांनी हे आदेश दिल्याचे समजते. याकरता गरीब कैद्यांना मोफत वकील उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
प्रलंबित असलेले खटले लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे देशभरातील सर्व उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांना एका पत्राद्वारे घालून देण्यात आली आहेत. सद्या न्यायालयातील प्रलंबित खटल्यांमुळे न्यायव्यवस्थेकडे बोट दाखविले जात असल्याने न्यायालयांची प्रतीमा डागाळत आहे. याशिवाय उशिरा न्याय मिळत असल्याने कैद्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याबद्दल सरन्यायाधीशांनी चिंताही व्यक्त केली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या