सरन्यायाधीशांनी कार्यपद्धती बदलावी!; माजी न्यायमूर्तींचा सल्ला

31

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी तेथील कामकाजाबाबत उठवलेले सवाल योग्यच आहेत असे सांगतानाच सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी आपली कार्यपद्धती बदलावी असा सल्ला चार माजी न्यायमूर्तींनी दिला आहे.

यासंदर्भात माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत, उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. पी. शाह, के. चंदू आणि होबेस्ट सुरेश यांनी सरन्यायाधीश मिश्रा यांना एक खुले पत्रच लिहिले आहे.

माजी न्यायमूर्ती काय म्हणतात
– सरन्यायाधीशांनी आपल्या मर्जीने खटले न्यायमूर्तींकडे सोपवणे चुकीचे आहे.
– संवेदनशील आणि महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी न्यायाधीशांकडे सोपवण्याबाबत नियम बनवण्यात यावा.
– सुनावणीसाठी प्रकरणे सोपवण्यासाठी नियम बनवला जात नाही तोपर्यंत सर्व महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी पाच ज्येष्ठ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने करावी.

आपली प्रतिक्रिया द्या