… आणि देशाचे सरन्यायाधीश उतरले क्रिकेटच्या मैदानात, तुफानी फलंदाजीने जिंकली मनं

911

न्यायालयात भल्याभल्यांना आपल्या कलमांनी चपराक देणारे देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे रविवारी नागपूरच्या विदर्भ क्रिकेट मैदानावर उतरले. बोबडे यांनी सलामीला येऊन गोलंदाजाला तीन चौकार मारुन आपण मैदानावरीलही ‘सरन्यायाधीश’ आहोत हे दाखवून दिले.

नागपूरच्या अंगाखांद्यावर खेळलेले शरद बोबडे हे सरन्यायाधीश झालेले आहे. नागपूरकरांसाठी ही गौरवाची बाब असल्यामुळे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा भव्य दिव्य ‘नागरी सत्कार’ करण्यात आला. नागपूरकरांनी त्यांच्याप्रतिची हृदयातील जागा राखीव ठेवावी. नागपूरकरांच्या सत्कारानंतर खऱ्या अर्थाने सरन्यायाधीश झाल्यासारखे वाटते अशी कृतज्ञ भावाना त्यांनी यावेळी व्यक्त केली होती. दरम्यान, सरन्यायाधीशांच्या संवेदनशिलेचे तसेच खेळाडू वृत्तीचे भरभरुन कौतूक करण्यात आले होते.

रविवारी विदर्भ क्रिकेट असोसिएशन (व्हीसीए)च्या मैदानावर याची प्रचिती देखील आली. एरवी काळ्या कोटाच्या पेहरावात दिसून येत असलेले सरन्यायाधीश बोबडे हे एक प्रोफेशनल क्रिकेटपटूच्या पेहरावात दिसून आले. हातात ग्लोव्हज, पायात पॅड, स्पोर्ट शूज, हातात बॅट घेऊन ते मैदानात फलंदाजीसाठी उतरले. नागपूर बार असोसिएशनच्या वतीने विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानावर ‘अ‍ॅव्होकेट इलेव्हन’ विरुद्ध ‘जज्ज इलेव्हन’ असा क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता. बोबडे हे ‘जज्ज इलेव्हन’ संघाचे नेतृत्व करत होते. हा सामना बघण्यासाठी विधीय वर्तुळातील अनेक विधीज्ज्ञ सकाळीच विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर पोहचते झाले होते. हिरव्या गार मैदानावर डावखोरे फलंदाज सरन्यायाधीश शरद बोबडे बॅट घेऊन उतरताच जमलेल्या क्रिकेट प्रेमींनी त्यांचे टाळ्या वाजवून जल्लोषात स्वागत केले. डावखोरे फलंदाज असलेले शरद बोबडे यांनी 30 चेंडूमध्ये 4 चौकार मारुन 18 धावा ठोकल्या.

आपली प्रतिक्रिया द्या