मनमानीपणे कर लादणं हासुद्धा सामाजिक अन्याय -सरन्यायाधीश

833

देशातील नागरिकांवर करांचा बोझा लादण्यात येऊ नये, असं सांगतानाच कर चोरी हा जसा आर्थिक गुन्हा आणि सामाजिक अन्याय ठरतो, तसाच सरकारनं जनतेवर मनमानी कर लादणं हासुद्धा एक प्रकारचा सामाजिक अन्यायच आहे, असं मत सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी व्यक्त केलं आहे.

इन्कम टॅक्स ट्रिब्युनलच्या 79 व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात सरन्यायाधीश बोबडे यांनी सामान्य जनतेच्या भावना बोलून दाखवल्या. यावेळी बोबडे यांनी कराला मधाची उपमा दिली. कोणताही कर मधासारखा वसूल केला पाहिजे. मध तर काढावं पण फुलांना नुकसानही होता कामा नये, अशी पद्धत असायला हवी, असंही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या