पन्नास खोके… मिंधे ओक्के, नाशकात शिवसैनिकांचा मुख्यमंत्री शिंदेंना प्रसाद

शिवसेनेशी गद्दारी करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शनिवारी नाशिकमधील शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे पोहोचले तेव्हा त्यांना निष्ठावंत शिवसैनिकांनी ‘पन्नास खोके… एकदम ओक्के’, ‘पन्नास खोके… मिंधे ओक्के’ अशा घोषणांचा प्रसाद दिला.

मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचला तेव्हा मिंधे गटाचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिकांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिवसैनिकही उपस्थित होते. शिंदे यांची गाडी येताच त्यांनी घोषणांना सुरुवात केली. शिवसैनिकांनी अचानक घोषणांचा पाऊस पाडल्याने शिंदे यांच्यासह पोलिसांचीही तारांबळ उडाली. मंत्री दादा भुसे हेसुद्धा शिंदे यांच्याबरोबर होते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)