महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर आज मंत्रालयात बैठक

973

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 7 डिसेंबर रोजी दुपारी मंत्रालयात महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राज्याचे मंत्री तसेच महाअधिवक्ता उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दुपारी तीन वाजता मंत्रालयात बैठक बोलावली आहे. या बैठकीला मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, डॉ. नितीन राऊत, मुख्य सचिव अयोज मेहता तसेच महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यासह राज्याच्या विधी व न्याय विभागाचे वरिष्ठ विधी सल्लागार उपस्थित राहणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या