चिखली – चिमुरडीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा

1932

चिखली येथे गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात एका 9 वर्षीय चिमुरडीला 2 नराधमांनी झोपेतून उचलून नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला होता. या बलात्कार्‍यांच्या विरोधात चिखली पोलिसांनी खटला दाखल करून आरोपींविरोधात पुरावे जमा केले होते. त्यामुळे दोन्ही आरोपींना विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश चित्रा हंकारे यांनी 13 ऑगस्ट रोजी फाशीची शिक्षा सुनावली. बलात्कारी नराधमांना न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा पीडितेला न्याय देणारी असून पोस्को कायद्यांतर्गत ही पहिली फाशीची शिक्षा असून या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.

मागील वर्षी चिखली शहरात आरोपी सागर बोरकर आणि निखील गोलाईत यांनी 26 एप्रिल 209 च्या मध्यरात्री एका 9 वर्षीय चिमुरडीवर अत्यंत क्रूरपणे बलात्कार केला होता. चिखली पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम 366 अ, 376 डी.बी. बाल लैंगिक अत्याचार कायदा 6 (पॉस्को) अंतर्गत खटला दाखल करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली होती.

केंद्रीय मंत्रिमंडळाने 2012 मध्ये मंजुरी दिलेल्या पॉस्को कायद्याच्या अंतर्गत 12 वर्षांपर्यंतच्या बालकांवर बलात्कार केल्याबद्दल दोषी ठरलेल्यांना फाशीची शिक्षा दिली जाईल. त्या कायद्या अंतर्गत जम्मू-कश्मीरच्या कठुआ आणि उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथे दोन सामूहिक बलात्कारानंतर बाल बलात्कार करणार्‍यास फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर चिखली येथील बलात्कार्‍यांना दिलेली पॉस्को कायद्यान्वये राज्यातील ही पहिलीच फाशीची शिक्षा असावी.

दरम्यान, पीडित मुलीचे आई-वडील गरीब असून आई गतिमंद आहे. पीडित मुलीला महिला व बाल कल्याण विभागाच्या मनोधैर्य योजने अंतर्गत चार लाख रुपये आर्थिक मदत मंजूर झाली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या