चिक्की घोटाळ्य़ाची चौकशी पूर्ण, पण कारवाई नाही; मुख्यमंत्र्यांचे सभागृहात उत्तर

38

सामना प्रतिनिधी । नागपूर

महिला आणि बालविकास विभागांतर्गत चिक्की आणि अन्य सामुग्रीची नियमबाह्य खरेदी केल्याने गैरव्यवहार झाला. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा चौकशी अहवाल सरकारला मिळाला आहे, परंतु यावर अद्याप कुठलीही कारवाई झाली नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

विधान परिषदेत आज यासंबंधी उपस्थित प्रश्नला लेखी उत्तर देताना चिक्की घोटाळ्याची चौकशी पूर्ण झाली असली तरी या पत्रातील मुद्द्य़ांबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अहवाल मागवण्यात आलेला असल्याचे म्हटले आहे. चिक्की घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे चौकशी अधिकारी यांनी कोणतीही चौकशी न करता ज्यांच्यावर आरोप आहेत त्याच विभागाकडून अभिप्राय मागवला. तसेच विभागाच्या अभिप्रायाप्रमाणे चौकशी अधिकाऱ्याचा निष्कर्ष दिलेला असल्याची तक्रार मुंडे यांनी एका प्रश्नाद्वारे केली होती. याप्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना देणाऱ्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करावेत. तसेच सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी मुंडे यांनी केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या