बाजारात सहज मिळणारे, तपकिरी रंगाचे आणि गोड चवीचे फळ म्हणजे 'चिकू' . या फळात बरेच औषधी गुणधर्म आहेत. चिकूचे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही ऋतुत उपलब्ध होऊ शकते. पाहूया हे फळ खाण्याचे फायदे. चिकूमध्ये जीवनसत्त्व बी, सी, ई आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मैंगनिज, फायबर, मिनरल आणि अँण्टी ऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असते. चिकूची पाने, फांद्या, मुळे, झाडाची साल असे सगळेच भाग औषधाकरिता वापरले जातात. वजन कमी करण्याकरिता या फळाचा आहारात समावेश केला जातो. ज्यांना पोटातील गॅसेसची समस्या आहे, त्यांना चिकू खाणे गुणकारी ठरते. चिकू खाल्ल्याने मेटाबॉलिजम नियंत्रणात राहतो. चिकूमधील पोषक तत्त्वामुळे पोट भरते. भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात राहते. चिकूमध्ये अँण्टी कॅन्सर गुण असतात. चिकू आणि चिकूच्या फुलांचा अर्क ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशींची वाढ थांबवतो. तसेच चिकूमधील मेथनॉलिक अर्कात कॅन्सरचे ट्युमर वाढू न देण्याची क्षमता असते. चिकूमध्ये एनर्जी स्त्रोत भरपूर प्रमाणात असते. यामध्ये कार्बोहायड्रेट असते त्यामुळे शरीर उत्साही राहते. अनिद्रा, औदासिन्य आणि चिंता असे त्रास असणाऱ्यांनी चिकू खावेत. यामधील विविध पोषक तत्त्वांमुळे मेंदुला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. त्वचेकरिताही चिकू लाभदायक आहे. यामध्ये मॉइश्चरायझिंगचे गुणही आहेत. त्यामुळे कोरड्या त्वचेचे रक्षण होते. त्वचेचा पोत सुधारतो. जीवनसत्त्व ए, इ, बी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे त्वचा चमकदार राहते. चिकू खाल्ल्याने मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते. ज्यांना झोपेचा त्रास असेल त्यांन या फळाच्या सेवनान आराम मिळतो. केसातील कोंडा घालवण्यासाठी चिकूच्या बियांची पेस्ट बनवा त्यात एरंडेल तेल मिसळा. हे मिश्रण केसांच्या त्वचेवर लावा. केस दुसऱ्या दिवशी साध्या पाण्याने धुवा. केसातील कोंडा निघून जाईल. चिकू खाण्यामुळे केस चमकदार होतील. चिकूच्या बियांपासून निघणारे तेल केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. चिकू फळ डोळ्यांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. जीवनसत्त्व ए भरपूर प्रमाणात असल्यामुळे डोळ्यांची बघण्याची शक्ती वाढते. मोतीबिंदू, रातांधळेपणासारखे डोळ्यांचे आजार कमी होतात. गरोदर महिलांनीदेखील चिकू खावेत. कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरसचे प्रमाण भरपूर असते. गर्भावस्थेत लागणारे कार्बोहायड्रेट या फळात असल्यामुळे तसेच गरोदरपणात उलट्या होणे, चक्कर येणे, मन चलबिचल होणे यासारख्या समस्यांवर आराम मिळतो. जे लोक रोज व्यायाम करतात त्यांनी चिकू खावेत कारण यामध्ये ग्लुकोज असते. त्यामुळे ऊर्जा मिळते.