चकली चोरली म्हणून चिमुकल्यांची चपलांचा हार घालून धिंड

45

सामना ऑनलाईन । उल्हासनगर

माणूसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उल्हासनरच्या कॅम्प-५ मध्ये घडली आहे. दुकानातून चकली चोरली म्हणून ८-९ वर्षाच्या दोन मुलांचं अर्ध टक्कल करून चपलांचा हार घालून त्यांची धिंड काढली. हे दुकानदार इथवरच थांबले नाही तर याची क्लिप मोबाईलमध्ये शूट करून ती व्हायरल केली. याप्रकरणी पीडित मुलांच्या पालकांनी हिललाईन पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प नंबर पाचमधील प्रेम नगर टेकडी येथे ही मुले घराबाहेर खेळत होती. यावेळी जवळ असलेल्या एका दुकानातून त्यांनी चकली चोरली. यावेळी दुकान मालक असलेले इरफान आणि तबकल पठाण या दोन नराधम भावांनी त्यांना पकडले आणि त्यांच्यावर हे अमानवी अत्याचार केले. कामावरून परतल्यावर हा सारा प्रकार कळताच मुलांच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. हिललाईन पोलिसांनी दोघा आरोपींविरोधात ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल केलाय.

आपली प्रतिक्रिया द्या