कौतुकास्पद! बालकलाकार सनायाने तिच्या कमाईतून केली मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत

5472

कोरोनाविरूद्ध सुरू असलेल्या लढ्याला आर्थिक बळ प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. या लढाल्या बळकटी मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन केले होते. अनेकजण या आजारामुळे उद्भवलेल्या संकटामुळे अडचणीत सापडले आहेत, त्यांना आपणही मदत करायला पाहिजे हे ओळखून अवघ्या 7 वर्षांच्या चिमुरडीने तिने कमावलेले 5 हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले आहेत. सनायाच्या या वयात, समाजाबद्दल असलेल्या जाणीवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सनाया ही स्टार प्रवाह वरील रंग माझा वेगळा या मालिकेत कुहू ही व्यक्तिरेखा साकारत आहे. सनायाला तिच्या मानधनाचे पैसे मिळाल्यानंतर तिच्या आईने तिला याचं तुझ्यासाठी काय घेऊया असं विचारलं. त्यावेळी तिने आपण सध्या जगावर जे संकट आलं आहे त्यासाठी काही मदत करू शकतो का असे विचारले. तेव्हा तिच्या पालकांनी तिला सांगितलं की आपण मुख्यमंत्री सहाय्य निधी मध्ये पैसे देऊ शकतो. त्यानंतर सनायाच्या पालकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाच हजार रुपयांची मदत केली. एवढ्या लहान वयात सनायाने दाखवलेला समजूतदारपणा पाहून तिच्या पालकांना तिचा प्रचंड अभिमान वाटत आह. बालमोहन विद्यामंदिर शाळेत शिकणाऱ्या सनायाने ज्यांना शक्य होईल त्यांनी सगळ्यांनी या महाभयंकर संकटापासून सगळ्यांचे रक्षण व्हावे यासाठी जमेल तशी मदत करावी असे आवाहन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या