आळंदी: इंद्रायणीत बुडालेल्या मुलाचे प्रेत आढळले

सामना प्रतिनिधी । आळंदी

लग्न सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आळंदीत आलेल्या १३ वर्षाच्या उदय शंकर लोंढे याचा इंद्रायणी नदी पोहत असताना बुडून मृत्यू झाला. रविवारी २ जुलै रोजी दुपारी ही दुर्घटना घडली. उदयचा मृतदेह मंगळवारी ४ जुलै रोजी चऱ्होली खुर्दच्या हद्दीत नदीपात्रात आढळला. उदय हा मूळचा पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे.

पोलिसांनी उदयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चाकण ग्रामीण रुग्णालय येथे पाठवला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातलगांच्या ताब्यात दिला जाईल, असे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण भोसले यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या