साहित्यकट्टा – मुलांमध्ये वाचनाची गोडी

>>प्रा. वर्षा चोपडे

पुस्तके माणसाला शहाण बनवतात. पुस्तके आपले जवन घडवतात. पुस्तकांमुळे माणूस संस्कारी होतो आणि तेच संस्कार जर मुलांना दिले तर सुदृढ समाज निर्माण होतो. पुस्तकांच्या माध्यमातून चांगल सामाजिक मूल्ये रुजवत चांगल पिढी घडविण्याचा प्रयत्न करूया.

रोआल्ड डहल रॉल्ड डहल एक ब्रिटिश कादंबरीकार, लेखक आणि युद्धकाळातील लढाऊ पायलट होते. ते लिहितात, आम्ही नागरिकांना विनंती करतो, आम्ही प्रार्थना करतो, कृपया तुमचा टीव्ही सेट फेकून द्या आणि त्याच्या जागी तुम्ही भिंतीवर एक सुंदर बुकशेल्फ स्थापित करा. या ओळी वाचनाचे किती महत्त्व आहे हे पटवून देतात. आपल्या देशात 80 च्या दशकामध्ये किंवा आधीच्या काळात लहान मुलांना आज-आजोबा रामायण आणि महाभारताच्या कथा सांगायचे. तेव्हा पुस्तकाचे चलन कमी होते. बुद्धकथा, पंचतंत्र आणि इतर लोककथांचा खजिना त्यांच्याकडे होता. आता पुस्तकरूपात आपण बऱयाच भाषांची पुस्तके सहज वाचू शकतो. प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांना त्यांच्या आजीने सांगितलेल्या गोष्टींमुळे लेखिका बनण्याची प्रेरणा मिळाली. जुन्या काळात स्त्रिया फार शिक्षित नव्हत्या, पण हो, त्या देवधार्मिक होत्या. पोथी-पुराण आणि भागवत सप्ताहात त्या नियमित जायच्या. त्यामुळे त्यांना धार्मिक कथा माहीत होत्या, पण त्या कथा आपल्या शब्दांत लिहिणे त्यांना सुचले नाही. प्रत्येक पिढीला तो खजाना गोष्टीरूपात मिळत गेला.

आपण इतिहासात वाचतो की, छत्रपती शिवाजराजे यांना घडवण्यात याच सकारात्मक आणि नैतिक संस्कारक्षम गोष्टींचा महत्त्वपूर्ण वाटा होता. जिजाऊ माँसाहेबांनी महाराजांना हिंदव स्वराज्य घडवण्यास प्रेरित केले. राजा कितीही शूर असला तरी चरित्रवान असावा अशी जिजाऊ माँसाहेबांची शिकवण होत आणि ती शिकवण राजे अक्षरशः जगले आणि आपल्या महापराक्रम आणि वागणुकीने जनमानसांत आदराचे स्थान प्राप्त केले.

महत्त्वाची गोष्ट अशी की, त्या काळात पुस्तके फार प्रचलित नव्हती आणि ठरावीक लोकांकडे त्यांची मत्तेदारी होती. आता जगात फार मोठे सांस्कृतिक आणि सामाजिक बदल झाले आहेत. अनेक देश, परदेश शूरवीर योद्धे आणि अनेक प्रेरक महान व्यक्तींच्या गोष्टी पुस्तकांमध्ये आपण सहज वाचू शकतो, पण मोबाइल, कॉम्प्युटरच्या युगात आपण पुस्तकांना विसरत चाललो. शैक्षणिक पुस्तकाला आजही महत्त्व असले तरी अनेक शैक्षणिक अॅप आणि डेटाबेसचे प्रचलन वाढले आहे. ई-पुस्तके उपलब्ध असल तरी कागदी पुस्तकांच तुलना त्यासोबत होऊच शकत नाही. लहान मुलांना मोबाइलचे वेड इतके लागले आहे की, त्यामुळे गुन्हेगारी, मानसिक आजार आणि तंटे वाढले आहेत. संवाद कम झाला आहे. अशा परिस्थितीत पुस्तकांची गोडी वाढवावी तर पालकांनी प्रथम मोबाइल कमी वापरणे गरजेचे आहे.

आज कॉम्प्युटरचे युग असूनही चांगल्या दर्जाची पुस्तक निर्मिती का होत नाही? संविधान नियम आणि कायद्यांची निर्मिती करणे केवळ बाबासाहेबांच्या प्रगाढ पुस्तकी ज्ञानामुळे आणि उच्च बुद्धिमत्तेमुळे शक्य झाले. कारण कुठल्याही सुविधा नसूनही पुस्तकांमुळे बाबासाहेब घडले. त्यांचे वैयक्तिक ग्रंथालय त्यावेळचे देशातील सगळय़ात मोठे वैयक्तिक ग्रंथालय होते. विचार करा, आज इतक्या सुविधा असूनही आपण मागे का? कारण आपण ग्रंथालयातल अमूल्य खजिना वाचायचा सोडून सोशल मीडियाचे गुलाम झालो.

पुस्तके माणसाला शहाण बनवतात. पुस्तके आपले जवन घडवतात. पुस्तके वाचताना त्यातल पात्रांमध्ये आपण बुडून जातो, त्याचा आनंद अवर्णनीय. ज्ञान लोक आपल्याला आवडतात, त्यांचे प्रत्येकाला आकर्षण असते, पण ते पुस्तकांमुळे या पदाला पोहोचले हे लक्षात घ्या. महाराष्ट्रातल संत तुकाराम महाराजांचे, संत ज्ञानेश्वरांचे, संत एकनाथ आणि इतर महान संत यांचे ग्रंथ वाचा. या मौल्यवान ग्रंथांमध्ये सात्त्विक आणि सर्वोत्तम महापुरुष घडवण्याच क्षमता आहे. गाडगेबाबा चालते बोलते विद्यापठ होते असे म्हटले जाते. त्यांच्यावर लिहिलेल पुस्तके बरेच काही सामाजिक ज्ञान देतात. छत्रपत शाहू महाराज आणि बहिणाबाईंविषय वाचा. आपले व्यक्तिमत्त्व बदलण्याच ताकद या आपल्या महान ग्रंथांमध्ये आहे. विज्ञान असो किंवा कुठलाही विषय असो, पुस्तकांश मैत्र करा. पुस्तकांमुळे माणूस संस्कारी होतो आणि तेच संस्कार जर मुलांना दिले तर सुदृढ समाज निर्माण होतो. गुन्हेगार आणि गुन्हेगारी नष्ट करण्याच ताकद या ग्रंथांमध्ये आहे. त्यामुळे ग्रंथालयांकडे वळा. आठवडय़ातून एकदा ग्रंथालयाला भेट देऊन मुलांमध्ये पुस्तकांविषय प्रेम निर्माण करा. चांगल्या पुस्तकांविषय चर्चा करा.

पुस्तकांच्या ज्ञानसागरात बुडून चांगल्या सामाजिक मूल्यांचा आणि चांगल्या नागरिकांच्या निर्मितचा प्रयत्न करा. कितही मंदिरात जा, मशिदीत जा, तुमच्या वेदना, दुःख तुम्ही देवाला सांगाल, पण खरे तर ग्रंथातून तुम्हाला त्यावर उपाय आणि ज्ञान मिळेल. महान व्यक्तींच्या जयजयकारासोबत त्यांचा आदर्श, त्यांच मूल्ये, उच्च दर्जाच वागणूक जरुरी आहे आणि त्यासाठी पुस्तके जवनाचा अविभाज्य घटक असायला हवत. ग्रंथपाल आणि पालक, आज, आजोबा मुलांमध्ये पुस्तकांच आवड निर्माण करू शकतात. भेट देण्यासाठी पुस्तक अमूल्य गिफ्ट आहे. ज्ञान कुठल्याही विषयाचे असो, त्याचा वापर मानव जवनमान उंचावण्यासाठी केला तर ते जगाचे कल्याणच करते आणि अविचाराने त्याचा वापर केला तर जगाचा विध्वंस होण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे चांगल पुस्तके वाचा आणि इंटरनेटचा कामापुरता वापर करून पुस्तकांना आपले मित्र बनवा. कारण पुस्तके तुम्हाला कधही धोका देणार नाहीत, तर ते तुमचे जवन उज्ज्वल आणि यशस्वच करतल. बोलण्याआध पहिले विचार करणे जरुरी असते आणि विचार करण्यासाठी पुस्तके मोलाचे मार्गदर्शन करतात.
[email protected]
(लेखक कोच, केरळ येथे राजगिरी सोशल सायन्सेस कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत)