Video – कश्मीरात पाकिस्तानच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-कश्मीरच्या बारामुला जिह्यातील उरी प्रांतात सीमेवर घुसखोरी करणाऱ्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी गुरुवारी ठार केले. त्यांच्याकडील मोठय़ा प्रमाणावर शस्त्रास्त्र आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. एलओसीजवळ संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम हाती घेत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. चौथा दहशतवादी फरार झाला आहे.