चीनमध्ये रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू; तीन जखमी

चीनमध्ये एका रेस्टॉरंटला भीषण आग लागली आहे. या आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ईशान्य चीनमध्ये ही घटना घडली आहे. या भीषण आगीत तीन जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. चीनच्या जिलिन प्रांताच्या राजधानीतील एका रेस्टॉरंटमध्ये रात्री 12:40 वाजता आग लागल्याची माहिती मिळत आहे. या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलासह स्थानिक पोलिसही घटनास्थळी पोहोचले. या घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी चीनच्या हुनान प्रांतात एका इमारतीला भीषण आग लागली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. व्यावसायिक इमारतीला ही आग लागली होती. वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे चीनमध्ये अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.