
जगभरात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जागतिक लोकसंख्येच्या तुलनेत अजून जगात 13 अब्ज लोक बँकिंग सुविधेपासून वंचित आहेत. तसेच डिजिटल पेमेंट करण्यामध्ये चीन हिंदुस्थानच्या पुढे आहे, अशी माहिती ग्लोबल फिंडेक्स डाटा बेसच्या अहवालात देण्यात आली आहे. चीनमध्ये 89 टक्के लोकांनी डिजिटल पेमेंट केले, तर हिंदुस्थानात 48 टक्के लोकांनी डिजिटल पेमेंट केले आहे. चीनमध्ये 97 टक्के लोकांकडे मोबाईल असून 86 टक्के लोक इंटरनेटचा वापर करतात, तर हिंदुस्थानात 66 टक्के लोकांकडे मोबाईल असून 46 टक्के लोक इंटरनेटचा वापर करतात.