‘हीच माझी कला’….197 महिलांची अंर्तवस्त्रे चोरली अन् त्याचे भरवले प्रदर्शन

हीच आहे माझी कला असा दावा करणारा चीनमधील एक व्यक्ती सध्या सोशल मिडीयावर चर्चेत आहे. कलेच्या नावाखाली त्याने  197 महिलांची चोरलेली अंर्तवस्त्रांचे त्याने प्रदर्शन भरवले. त्याने ही अंतवस्त्रे प्रदर्शनात सादर केल्याची घटना  बिजींगमध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच याची दखल घेत पोलिसांनी कलाकार म्हणवणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.

ज्हांग मिंगशीन असे अटक केलेल्याचे नाव आहे. चीनमध्ये दरवर्षी सिग्नेचर आर्ट प्राईज नावाची स्पर्धा भरवली जाते. कला विश्वातील नवोदितांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या कलेचा सन्मान व्हावा यासाठी 2006 पासून ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदाही या स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात ज्हांगनेही सहभाग नोंदवला होता. त्यात त्याच्या प्रदर्शनाचे  थिम197 असे नाव होते. सिग्नेचर आर्ट प्राईजने 197 नावाच्या या कलाकृतीला त्यांच्या वेबसाईवर अपलोड केले. त्यावेळी लोकांनी या कलाकृतीवर प्रचंड टीका केली. अनेकांनी संताप व्यक्त करत या कलाकाराला अटक करण्याची मागणी केली.

या कलाकृतीची संकल्पना आपल्याला गर्लफ्रेण्डमुळे सूचली, असे ज्हांग मिंगशीनने सांगितले. चार वर्षांपूर्वी त्याच्या गर्लफ्रेण्डची अंर्तवस्त्रे चोरण्यात आली होती. तेव्हापासून ज्हांगने आपणही अंर्तवस्त्रे चोर बनायचे ठरवले. त्यासाठी त्याने अनेक महिलांची अर्तवस्त्रे चोरी केल्याचे सांगितले. या पदर्शनासाठी दोन वर्षांपासून महिलांची अंर्तवस्त्रे बाल्कनीतून चोरी करत असल्याचे त्याने सांगितले. या चोरलेल्या महिलांच्या अंर्तवस्त्रांच्या घड्या घालतानाचा 47 सेकंदाचा व्हिडीओही त्याने सोबत जोडला आहे.

ज्हांगच्या या कृत्याबाबत अनेकांनी टिका केली,. त्यात एका महिलेने अशा विचीत्र माणसाला अंर्तवस्त्र चोरी केल्यामुळे गुन्हा दाखल करायला हवा, मात्र पोलिसांनी अटक केल्यानंतर या व्यक्तीने आपण सगळीच अंर्तवस्त्रे चोरी केलेली नसून काही विकत घेतलेले आहेत अशी कबूलीही दिली.

हीच आपली कला असल्याचा दावा त्याने केला आहे. महिलांची अंतवस्त्रे त्यांच्या बाल्कनीतून चोरणे, त्याच्या घड्या घालणे. ती व्यवस्थित ठेलत प्रदर्शनात मांडणे, हे अवघड काम असून ही एकप्रकारची कला असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी या प्रदर्शनातील या विचित्र कलेची आणि या कलाकाराची दखल घेत त्याला अटक केली आहे. त्याची चौैकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या