चीनने डझनभर मुस्लिम नावांवर घातली बंदी

12
सामना ऑनलाईन । बीजिंग
चीनमधील झिनजियांग या मुस्लिमबहुल भागात इस्लाम, सद्दाम, जिहाद, इमाम, कुराण, आणि मक्का यासारख्या डझनभर मुस्लिम नावांवर बंदी घालण्यात आली आहे. ही नावे धर्माशी संबंधित असून प्रक्षोभक असल्याने त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.
मुलाचे अथवा मुलीचे नाव मुस्लिम धर्माशी संबंधित असल्यास त्याला किेंवा तिला शाळेत प्रवेश मिळणार नाही तसेच कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी घोषणा चीनने केली आहे.
झिनजियांग या प्रांतात धार्मिक कारणावरुन हिंसक घटना घडल्यानंतर चीनने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानशी मैत्री असली तरी चीनमध्ये कट्टर इस्लामला स्थान द्यायचे नाही अशा भूमिकेतून चीनने घेतली आहे. याआधी झिनजियांगमध्ये काही कट्टर विचारांच्या लोकांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या