‘जियो टिकटॉक’? बाइटडांस-रिलायंसची बोलणी सुरू असल्याची चर्चा

541

देशातील तरुणांवर भुरळ घालणाऱ्या ‘टिकटॉक’ चायनीज अॅपवर सध्या बंदी घालण्यात आली आहे. मात्र ‘टिकटॉक’ पुन्हा एकदा हिंदुस्थानात वापरण्यास परवानगी मिळू शकते. याचे कारण रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार ‘रिलायंस इंडस्ट्रीज’ टिकटॉकचा हिंदुस्थानातील व्यवसाय खरेदी संदर्भात करार करू शकते.

रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, टिकटॉक की पॅरेंट कंपनी बाइटडांस आणि मुकेश अंबानीच्या मालकीची रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) यांच्यात बोलणी सुरू आहे. ही बोलणी अगदीच प्राथमिक स्वरूपाची असल्याचे बोलले जाते.  अजून, दोन्ही कंपन्या कोणत्याही निर्णयावर पोहोचलेल्या नाहीत. रिलायंस आणि टिकटॉककडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

दरम्यान, जुलै महिन्यात केंद्र सरकारने टिकटॉकसह 59 चायनीज अॅपवर बंदी आणली होती. सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव ही कारवाई केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या