… म्हणून कुटुंबातील 11 जणांनी एकमेकांशीच केले 23 वेळा लग्न, कारण वाचून धक्का बसेल

62837

सरकारी योजनांचा फायदा मिळवण्यासाठी लोक काय करतील हे सांगता येत नाही. आपल्याकडे शेजारच्या शेतातील विहिर आणि नातेवाईकांच्या घरातील संडासही आपला असल्याचे दाखवून अनुदान लाटल्याचे प्रकार समोर आले आहे. परंतु चीनमधील एक प्रकरण तर यापेक्षाही भयंकर आहे. येथे सरकारी योजनेचा फायदा मिळवण्यासाठी एकाच कुटुंबातील 11 सदस्यांनी दोन आठवड्यात एकमेकांशीच तब्बल 23 वेळा लग्न केले आणि घटस्फोटही घेतला.

CNN ने दिलेल्या वृत्तानुसार, झेजियांग प्रांतातील लिशुई शहरातील एका छोट्या गावात शहरी नूतनीकरण भरपाई योजना सुरू करण्यात आली. याची माहिती पैन नावाच्या एका व्यक्तिला कळते. या योजनेअंतर्गत सरकारकडून स्थानिक नागरिकांना कमीत कमी 430 फूटाचे अपार्टमेन्ट देण्याची सुविधा देण्यात आली होती. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनाही ही घरे मिळणार होती. पैनने या सरकारी योजनेचा फायदा घेण्यासाठी पूर्व पत्नीशी दुसऱ्यांदा लग्न केले. अवघ्या सहा दिवसात पैनला जमीन मिळाली. जमीन मिळाल्यानंतर त्याने पूर्व पत्नीला पुन्हा घटस्फोट दिला. यानंतर याच कुटुंबातील इतर सदस्यही या घोटाळ्यात सामील झाले.

china

पैनने जमिनीच्या लालसेपोटी सख्खी बहीण, मेहुणीशी लग्न केले. याचदरम्यान पैनच्या वडिलांनी इतर नातेवाईकांशी लग्न केले. या लग्न घोटाळ्यात त्याची आई देखील सहभागी होती. एकमेकांशी लग्न केल्यानंतर त्यांनी गावातील नागरिक म्हणून नोंदणी केली आणि नंतर घटस्फोट घेतला. पैनने एका आठवड्यात तीनदा लग्न केलं आणि लग्नाची नोंदणी केली.

दरम्यान, सरकारी अधिकाऱ्यांना पैनच्या या घोटाळ्याबद्दल कळलं. शोध घेतल्यावर त्यांना दिसलं की, 11 लोकांच्या घरचा पत्ता एकच आहे. घोटाळ्याचा खुलासा झाल्यानंतर सर्वांना अटक करण्यात आली. यानंतर काही सदस्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या