
चीनमध्ये एका लग्नात तरुणाने भर लग्नात त्याच्या होणाऱ्या पत्नीची तिच्या भावोजींसोबतत्या अनैतिक संबंधांची व्हिडीओ क्लिप लावली. तो सर्व प्रकार पाहून सर्वांना धक्का बसला. नवरीला व तिच्या भावोजींना मात्र कुठेही तोंड दाखवायला जागा उरली नव्हती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
2019 साली टिकटॉकवर हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा चीनमध्ये हा व्हिडीओ व्हायरल झाला असून पुन्हा एकदा या जोडप्याच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.
या व्हिडीओत एक तरुण तरुणी लग्नासाठी तयार होऊन मांडवात उभे होते. एका बाजूला मोठ्या स्क्रिनवर त्या जोडप्याचे व्हिडीओ दाखवले जात होते. असे असतानाच अचानक अश्लील आवाजांनी सर्वांना धक्काच बसला. सर्वांनी त्या स्क्रिनकडे पाहिले तर तिथे नवरी मुलीचा सेक्स व्हिडीओ सुरू होता. त्यावरच हा धक्का थांबला नाही तर त्या तरुणीसोबत चक्क तिच्या सख्ख्या गरोदर बहिणीचा नवरा होता. त्या दोघांच्या अनैतिक संबंधांचा तो व्हिडीओ लावला होता नवरा मुलानेच.
तो व्हिडीओ पाहून तरुणी हादरली. तिने तत्काळ नवऱ्या मुलाकडे धाव घेतली. मात्र त्याने आपणच हा व्हिडीओ लावल्याचे सांगितल्यावर तिला धक्का बसला. तिने तिच्या हातातील बुके नवऱ्या मुलाला मारून तिथून ती निघून गेली,